मंकीपॉक्स वायरस म्हणजे काय ? लक्षणे व उपाय

मंकीपॉक्स वायरस म्हणजे ? लक्षणे व उपाय

                   मंकीपॉक्स वायरस म्हणजे ? लक्षणे व उपाय 


तुम्ही व्हायरस हा शब्द अनेकदा ऐकला व वाचला असेल . उदाहरणार्थ कोरोना व्हायरस , एच आय वी व्हायरस , स्पॅनिश फ्ल्यू व्हायरस इत्यादी . 

   व्हायरस हा शब्द ऐकल्यावर आपल्याला कोरोना व्हायरस ची आठवण येते . व्हायरस हा आपल्या डोळ्यांना न दिसणार एक विषाणू आहे. तो आपल्या डोळ्यांना दिसत नाही. व्हायरस फक्त विद्युत सूक्ष्मदर्शकाने ( electron microscope ) दिसतो.

  सध्या असाच एक विषाणू जगात वेगाने पसरत आहे. ज्याचे नाव मंकिपॉक्स व्हायरस आहे . ज्याच्या विषयी तुम्ही बातम्यांमध्ये ऐकले किंवा वाचले असेल . मिळालेल्या माहितीनुसार हा विषाणू आफ्रिकेतून जगात वेगाने पसरत आहे .

या विषाणूचा वाढता प्रसार लक्षात घेता लोक इंटरनेटवर याविषयी माहिती शोधत आहेत. जसे की मंकिपॉक्स व्हायरस काय आहे ? , त्याची लक्षणे कोणती ? उपाय काय करावे ? कुठून याचा सर्वप्रथम प्रसार झाला . 

म्हणूनच आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण हा मंकिपॉक्स व्हायरस काय आहे ? त्याची लक्षणे कोणती ? उपाय काय करावे ? याची माहिती आपण या ब्लॉग पोस्ट मध्ये घेऊया . 

तर सर्वप्रथम जाणून घेऊया की monkeypox व्हायरस म्हणजे काय ?

   मंकिपॉक्स व्हायरस म्हणजे काय ? What is the monkeypox virus ? 

      

मंकिपॉक्स  हा एक मांकिपॉक्स विषाणू द्वारे होणारा संसर्गजन्य आजार आहे. 1958 मध्ये डेन्मार्क देशातील कोपनहेगन शहरातील प्रयोग शाळेतील माकडांना मध्ये  mpox म्हणजेच मांकीपॉक्स हा एक वेगळा आजार म्हणून ओळखला गेला. . 1970 मध्ये रिपब्लिक ऑफ कांगो देशात मानवामध्ये पहिले हा रोग आढळून आला होता .  

      Monkeypox हे  नाव माकडांत सर्वप्रथम आढळल्यामुळे ठेवण्यात आले होते.  पण नंतर त्याच्यावर नावावर टीका झाल्याने जागतिक आरोग्य संघटनेने त्याचे नाव. Mpox ( एमपॉक्स ) केले. व जाहीर केले की ते आपल्या संदेशामध्ये mpox नाव वापरतील व इतरांनाही ते नाव वापरण्यासाठी प्रोत्साहित करतील .  


        मंकी पॉक्स व्हायरस हा जगात वेगाने पसरत आहे .हे लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणिबाणी घोषित केली .कारण हा आजार जगातील 12 पेक्षा जास्त देशांमध्ये वेगाने पसरत आहे.

     मंकिपॉक्स आजाराची लक्षणे कोणती आहेत ? What are the symptoms of monkeypox disease? 

    मंकिपॉक्स रोगाची ताप , डोकेदुखी , स्नायू दुखणे अशी लक्षणे सुरुवातीच्या काळात दिसू लागतात. गुंतागुंतीच्या लक्षणांमध्ये न्युमोनिया सारखे लक्षणे दिसतात. 
2 ते 4 आठवड्यात याची लक्षणे दिसण्यास सुरुवात होते.


    मंकिपॉक्स आजारावर उपचार कोणता आहे ? What is the treatment for monkeypox disease? 

मंकिपॉक्स आजारावर पुढीलप्रमाणे उपाय करता येतात. 
1. स्वच्छता राखणे.
2. आजाराची तीव्रता दिसू लागताच वैद्यकीय उपचार करणे.
3. संक्रमित झालेल्या व्यक्तिपासून दूर राहणे व त्याला योग्य उपचार घेण्यास सांगणे.
4.  या रोगाची लक्षणे दिसू लागलेल्या व्यक्तीशी शारीरिक संबंध न ठेवणे . इत्यादी.

भारत सरकारने या रोगाविषयी काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्यामध्ये सर्व विमानतळ विशेषतः आंतरराष्ट्रीय विमानतळ , बंदर , मोठी शहरे ( ज्या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय वाहतूक चालते ) अश्या ठिकाणी आरोग्य सुविधा अधिक संवेदशिल बनवणे.  


Marathitez ब्लॉग तर्फे ह्या रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी काही विनंतीवजा सूचना व उपाय .

     आम्ही marathitez ( मराठीतेज ) ब्लॉग  आपल्या सुखी व स्वस्थ आरोग्याची कामना ( प्रार्थना ) करतो. म्हणूनच आम्ही तुम्हाला मंकिपॉक्स आजार रोखण्यासाठी काही विनंतीवजा मार्गदर्शक सूचना व उपाय सांगू इच्छितो. आम्हाला अशी अपेक्षा आहे की आपण या सूचनांचे तसेच सरकार व जागतिक आरोग्य संघटने द्वारे दिल्या जाणाऱ्या सर्व सुचनांचे पालन कराल . 


  अस्विकरण : - marathitez ( मराठीतेज ) ब्लॉग तर्फे दिल्या जाणाऱ्या सूचना या केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने दिला आहेत. या सूचना कोणत्या सरकारने , सरकारी कर्मचाऱ्यांनी , किंवा कोणत्याही संघटनेने दिल्या नसून केवळ माणुसकीच्या नात्याने marathitez ब्लॉग देत आहे. त्यामुळे या सूचनांना उपाय व उपचार समजून यांवरच अवलंबून राहू नये. रोगाची लक्षणे दिसू लागताच योग्य वैद्यकीय उपचार करून घ्यावेत. सरकारच्या तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनांचे पालन करावे . ही नम्र विनंती.

   Marathitez ब्लॉगच्या विनंतीवजा सूचना 

1. आपल्या शरीराची योग्य स्वच्छता ठेवावी .
2. आपल्या परिसराची स्वच्छता ठेवावी.
3. विदेशातून आलेल्या व्यक्तीशी थेट संपर्क साधणे टाळावे. 
4. रोगाची लक्षणे दिसलेल्या तसेच संक्रमण झालेल्या व्यक्तिपासून दूर राहावे किंवा त्या व्यक्तीला अलग ठेवावे . जेणेकरून हा आजार इतर व्यक्तींमध्ये पसरणार नाही.
5. ज्या देशांमध्ये किंवा शहरांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात आहे तिथे सध्या तरी जाण्याचे टाळावे . जर अत्यंत आवश्यक असेल तर योग्य खबरदारी घेऊनच अश्या ठिकाणी जावे.
6. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढेल अशा आहार घ्यावा. 
7. कोविड 19 चा अनुभव लक्षात घेता पैशांची बचत करावी . जेणेकरून जर कदाचित लॉकडाऊन लागल्यास ती बचत पुढे वापरता येईल. 
8. या रोगाची माहिती मिळवण्यासाठी वृत्तपत्रे , टीव्ही वरील न्यूज चॅनल , रेडिओ वरील बातम्या ऐकाव्या / पाहाव्या / वाचाव्या .
9. सोशल मीडियाद्वारे या रोगविषयी अफवा , चुकीची माहिती , जातीय , धार्मिक दंगली निर्माण होतील अशी पोस्ट व माहिती पसरवू नये.
10. मोबाइलवरील विशेषतः सोशल मीडियातील व इंटरनेटवरील कोणत्याही बातमीची 
 सत्यता तपासून पाहिल्याशिवाय ती पुढे पाठवु नये . इतर लोकांना सांगू नये. 
11. अफवांना बळी पडू नका. 

   ही आहेत ह्या ब्लॉग तर्फे काही विनंतीवजा मार्गदर्शक सूचना आशा आहे की तुम्ही ह्या सूचनांचे पालन करण्याचे प्रयत्न कराल.


     तर ही आहे मंकिपॉक्स व्हायरस काय आहे ? लक्षणे व उपाय याची माहिती . अपेक्षा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल . जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल ते आपल्या मित्रांना , नातेवाईकांना जरूर शेअर करा. याविषयी काही प्रश्न , सूचना असल्यास अम्हला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा .
     तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद असेच ब्लोगला भेट देत जा . तुमचा वर्तमान वेळ आणि संपूर्ण दिवस शुभ, आनंदी आणि आरोग्यपूर्ण जावो हीच सदिच्छा.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जागतिक पर्यावरण दिवस माहिती मराठी

दिवाळी सण माहिती मराठी